Breaking News

मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक पलटी; चालकाचा मृत्यू

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली एक्झिटजवळ शुक्रवारी (दि. 23) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सिमेंटच्या गोणी भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन त्याने पुढे चाललेल्या ट्रकला धडक देऊन पलटी झाला. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकमधील सिमेंटच्या गोणी रस्त्यावर पसरल्याने महामार्गावरील वाहतूक काहीकाळ बाधित झाली होती. सिमेंटच्या गोणी घेऊन जाणारा ट्रक शुक्रवारी पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होता. खोपोली एक्झिटजवळ  ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. सिमेंटच्या गोणी भरलेला ट्रक पुढे जाणार्‍या ट्रक (एमएच-13,डिओ-9526) ला धडक देऊन रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात ट्रकचा चालक सूर्यकांत कांबळे (कर्नाटक) याचा मृत्यू झाला. ट्रकमधील सिमेंटच्या गोणी रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने काहीकाळ वाहतूक बाधित झाली. मात्र क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक तसेच सिमेंटच्या गोणी बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यास प्रशासनाला यश आले. अपघात घडतात आयआरबी, यंत्रणा, देवदूत, खोपोली व हायवे पोलीस, तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजीक संस्थेचे सदस्य यांनी घटनास्थळी येऊन मदत कार्यात सहभाग घेतला. खोपोली पोलीस पुढील तपास करीत आहेत. खोपोली परिसरात दररोज अपघात होत असल्याने वाहन चालकात भीतीचे वातावरण पसरले आहे.

रायगड जिल्ह्यात रस्ते अपघातात वर्षभरामध्ये 139 जणांचा मृत्यू

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी  महामार्गांवरील अपघातांमध्ये वाढ झाली आहे. रस्ता अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडणार्‍या आणि जखमी होणार्‍यांची संख्या वाढली आहे. वर्षभरात रायगड जिल्ह्यात महामार्गांवर  झालेल्या अपघातात 139 जणांचा मृत्यू झाला तर 264 जण गंभीर जखमी झाले. रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत 2021 मध्ये 354 अपघातांची नोंद झाली होती. त्यात 124 जणांचा मृत्यू झाला होता तर 184 जण गंभीर जखमी झाले होते. यातुलनेत 2022 मध्ये 365 अपघातांची नोंद झाली. या अपघातांमध्ये 184 जणांचा बळी गेला तर 264 जण गंभीररित्या जखमी झाले. रायगड जिल्ह्यातून तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जातात. यात मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक 66, मुंबई-पुणे द्रूतगती मार्ग आणि मुंबई-पुणे महामार्ग क्रमांक 4 या राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. वर्षभरात मुंबई-गोवा महामार्गावर 168 अपघात झाले, त्यात 56 जणांचा मृत्यू झाला. मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर 119 अपघात झाले. त्यात 52 जणांचा मृत्यू झाला.  मुंबई-पुणे महामार्ग 4 या महामार्गावर 78 अपघात झाले, त्यात 31 जणांचा मृत्यू झाला. अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, तीव्र उतार आणि वाहन चालकांचा बेदरकारपणा ही या अपघातांमागची प्रमुख कारणे आहेत. तर द्रूतगती मार्गावर लेनची शिस्त न पाळणे, वेग मर्यादा न पाळणे, गाड्यांचे टायर फुटणे ही अपघातांमागची प्रमुख कारणे आहेत. या शिवाय दारू पिऊन गाडी चालवणे, चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेकींग करणे यामुळेही अपघात होत आहेत. मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर ट्रक चालकांकडून घाट उतारावर वाहने न्यूट्रल गेअरवर चालवली जातात. ज्यामुळे वाहनांवरील ताबा सुटतो आणि अपघात होतात.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply