Breaking News

कोरोना रोखण्यासाठी पनवेल मनपा सज्ज

पनवेल : प्रतिनिधी

चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका प्रशासनाच्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्या वतीने विविध पातळ्यांवरती तयारी करण्यास सुरूवात केली आहे.

कळंबोली येथे कोविड समर्पित रूग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत तसेच महापालिका स्वत:ची आरटीपीसीआर लॅब सुरू करणार आहे. आरटीपी-सीआर चाचण्यांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. या सर्वांसाठी लागणार्‍या मनुष्यबळाचे नियोजन वैद्यकिय आरोग्य विभागच्या वतीने करण्यात येत आहे.

महापालिकेचे पहिल्या डोसचे 109 टक्के, दुसर्‍या डोसचे 102 टक्के तसेच बुस्टर डोसचे 17 टक्के लसीकरण झाले आहे. महापालिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोवॅक्सीन लसीकरण सुरू असून ज्या नागरिकांचा लसीकरणाचा दुसरा डोस राहीला आहे, त्यांनी लसीकरण करून घ्यावे  तसेच  बुस्टर डोसचे लसीकरणही महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. नागरिकांनी बुस्टर डोसचे लसीकरण करून, असे आवाहन करण्यात येत आहे.

नागरिकांना आवाहन

सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, गर्दीमध्ये इतरांपासून सुरक्षित अंतर राखणे, सातत्याने हात धुणे , आजारी असल्यास घरी अलगीकरणात रहाणे या प्राथमिक गोष्टीची खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply