Breaking News

नियम पाळून नववर्षाचे स्वागत करा

पनवेलमध्ये पोलिसांचे आवाहन

पनवेल : वार्ताहर

गतवर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करताना शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून स्वागत करा, असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी केले आहे. पनवेल तालुका पोलीस ठाणे मंथन हॉल याठिकाणी 31 डिसेंबर 2022 गत वर्षाला निरोप व नव वर्षाचे स्वागत या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दितील असणारे फार्म हाऊस अथवा रिसॉर्टचे चालक मालक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी अनिल पाटील बोलत होते. या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले की, आपण आपल्या मालकीच्या अथवा ताब्यात असलेल्या जागेत नववर्षाच्या स्वागता निमित्त आयोजित करत असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यक्रमात सहभागी होणार्‍या लोकांचे जीवितास कोणत्याही प्रकारे धोका होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी आपण घ्यावी. महिला सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. महिलांची छेडछाड होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. तसेच कार्यक्रमास कोणी मद्यपान केले असल्यास त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या राहत्या घरी सोडण्याची उपाय योजना करावी. कार्यक्रमास आपले फार्म हाऊस रिसॉर्ट हॉटेल रेस्टॉरंट या ठिकाणी कोणीही ड्रग्स अमली पदार्थाचे सेवन किंवा इतर कोणतेही मादक पदार्थाचे सेवन करणार नाही अथवा ठेवणार नाही तसे आढळल्यास संबंधितावर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. ते पुढे म्हणाले की, 31 डिसेंबर 2022 या दिवसाचा आनंद लुटण्यासाठी काही लोक आपले कुटुंबासह अथवा नातेवाईक अथवा मित्रपरिवार फार्म हाऊस व फार्म हाऊस वरील पाण्यात पोहण्यास जातात परंतु पाण्यात पडून बुडून कोणाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील. 31 डिसेंबर 2022 निमित्त फार्म हाऊस अथवा रिसॉर्ट या ठिकाणी मध्य विक्री करावयाची असल्यास संबंधित विभागाकडून योग्य ती परवानगी घेणे अनिवार्य आहे. कोणत्याही प्रकारचा मनोरंजनाचा अथवा अन्य कार्यक्रम विनापरवाना करताना मिळून आल्यास अगर सदर कार्यक्रमात अपघात अथवा आक्षेपार्ह कृत्य घडल्यास त्या सर्वस्वी आपणास जबाबदार धरून आपले विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आपण अथवा आपल्या कुटुंबासह अथवा नातेवाईक अथवा मित्रपरिवार अथवा हितचिंतकांकडून 31 डिसेंबरनिमित्त प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे शासनाने पारित केलेले आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करू नये, जेणेकरून आपले पासून दुसर्या त्रास होऊन सार्वजनिक शांतता धोक्यात येईल. यासोबतच कार पार्किंग ठिकाणी भरपूर प्रकाश व्यवस्था व सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावे तसेच गाड्यांची तोडफोड, नासधूस, चोर्‍या यास प्रतिबंध करण्यासाठी ज्यादा सुरक्षा रक्षक नेमावेत. अग्निशमन यंत्रणा कार्यरत ठेवावी. किचनमधील सुरक्षितता तपासून घ्यावी. गॅस सिलेंडरचा साठा रॉकेल अथवा डिझेलचा साठा याकडे विशेष लक्ष पुरवावे. सर्व विद्युत उपकरणांची तपासणी व चाचणी घेऊन ते व्यवस्थित काम करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित विभागाकडून प्राप्त करून घ्यावे. अशा प्रकारचे उपस्थितांना सुचना देण्यात आल्या आहेत. बैठकीकरिता फार्म हाऊस अथवा रिसॉर्टचे चालक मालक असे एकूण 50 जण उपस्थित होते. तसेच फार्म हाऊस अथवा रिसॉर्टचे चालक मालक यांना सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच जे बैठकी करीता उपस्थित राहिले नाही त्यांनादेखील नोटीस बजावण्याचे तजवीज ठेवण्यात आली आहे. या वेळी बैठकीला तालुका हद्दीतील मोठ्या प्रमाणात फॉर्म हाऊस मालक-चालक, हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

हॉटेल चालकांना सूचना

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक नागरिक सेलिब्रेशन करीत असतात. त्यासाठी बाहेर फिरण्यासाठी जात असतात. या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दितील असणारे फार्म हाऊस अथवा रिसॉर्टचे चालक मालक यांना पोलिसांनी बैठकीत कायदा व सुवस्था राखता यावा याबाबत विविध सूचना केल्या.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply