पनवेल : रामप्रहर वृत्त
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये मराठी नाटकांच्या भाड्यामध्ये 75 टक्के सवलतीच्या निर्णयाचे भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले. या निर्णयाबद्दल पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आभारपत्र देण्यात आले.
कोरोना संसर्गानंतर मुंबईपासून जवळ असणार्या मेट्रोपॉलिटिन शहरांमध्ये पनवेल हे नाट्य कलावतांसाठी मध्यवर्ती ठिकाण बनले आहे. कोरोना साथरोगानंतर मराठी नाट्य व्यवसायावर आलेली मरगळ दूर करण्यासाठी कलाक्षेत्रातून मराठी नाट्य व्यवसायाला बळ मिळण्यासाठी भाडेदरात सवलत मिळण्याची मागणी केली जात होती. या मागणीचा विचार करीत तसेच पनवेलकरांची सांस्कृतिक भूक भागावी व उत्तमोत्तम नाट्य कलाकृती पनवेलकर रसिकांना बघायला मिळाव्यात ह्या हेतूने नुकत्याच पार पडलेल्या प्रशासकीय बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने सुचविलेल्या 75 टक्के भाडे सवलतीच्या ठरावाला मंजुरी दिली त्याबद्दल आपले आभार मानण्यात आले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …