Breaking News

सीकेटी विद्यालयाचे वार्षिक बक्षीस वितरण

माजी उपमहापौर चारूशीला घरत यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील पूर्वप्राथमिक विभागाचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा बुधवारी (दि. 28) उत्साहात साजरा झाला. हा सोहळा इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे आणि पर्यवेक्षिका संध्या अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा झाला. पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी शैक्षणिक वर्षात कला आणि क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला. या वेळी महिला मोर्चाच्या सरोज मोरे, अभिलाषा ठाकूर, संस्थेचे सहसचिव भाऊसाहेब थोरात शिक्षक पालक संघाचे सदस्य संकेश मोकल, आराध्या तळेकर, मयुरी शेडगे, इंग्रजी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य प्रशांत मोरे, मराठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे, मराठी पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, इंग्रजी माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका नीरजा अधूरी, इंग्रजी पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे, इंग्रजी पूर्वप्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका संध्या अय्यर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply