Breaking News

लिमये वाचनालयाचा वर्धापन दिन उत्साहात

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरातील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा बुधवारी (दि. 28) उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी त्यांनी संस्थेच्या नवीन वास्तूसाठी भरघोस मदत करणार असल्याचे आश्वासन दिले.
पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झालेल्या वर्धापन दिन सोहळ्यास उद्योजक जे. एम. म्हात्रे, ग्रंथालय संचालनालयाच्या सहसंचालक शालिनी इंगवले, संस्थेच्या अध्यक्ष सुनिता जोशी, सचिव काशिनाथ जाधव, अ‍ॅड. माधुरी थळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त ग्रंथालयात श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महापूजेचे दर्शन घेऊन संपूर्ण ग्रंथालयाची पाहणी केली व सद्यस्थितीची माहिती घेतली.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply