Breaking News

धान उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी 15 हजार बोनस; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी
धान उत्पादक शेतकर्‍यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार या शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी 15 हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात याची घोषणा केली.
मुख्यमंत्री म्हणाले, धान उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी 15 हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दोन हेक्टरी प्रोत्साहनपर हा बोनस दिला जात आहे. शासनाच्या या घोषणाचा फायदा पाच लाख शेतकर्‍यांना होणार आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply