कर्जत : प्रतिनिधी
शिवस्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था-जिते आणि गुंज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त कर्जत तालुक्यातील जिते व कुंभे आदिवासी वाडीमध्ये दैनंदिन वापराच्या घरगुती साहित्याचे वाटप करण्यात आले.
गुंज फाउंडेशनचे आनंद खरे यांच्या सहकार्याने तसेच अॅड. रंजना धुळे व हर्षद (सोनु) भोपतराव यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव निमित्त जिते व कुंभे आदिवासी वाडीमध्ये घरगुती साहित्य वाटप करण्यात आले तर मारुती भोसले यांना व्हीलचेअर देण्यात आली. जिते ग्रामपंचायत सदस्या वंदना हजारे, माजी उपसभापती काशिनाथ मिरकुटे, शिवस्वराज्य संस्थेचे अध्यक्ष अक्षय जाधव, सचिव विकास शेळके, चंद्रकांत हजारे, किरण जाधव, खजिनदार निलेश घरत, मयुर जाधव, आकाश शेळके, रोहित हजारे, नामदेव मुकणे, वामन वाघमारे, पिंट्या मुकणे, हरिश्चंद्र मिरकुटे, मंगल मिरकुटे, दशरथ मिरकुटे, काळुराम मिरकुटे ,मोहित जाधव, सुदेश हजारे, सुमीत जाधव, रोनित जाधव, रितेश दाभणे, हर्षद जाधव, कुणाल जाधव, शिवम जाधव, मंथन शेळके यांच्यासह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …