Breaking News

पीटरसनही म्हणतो, सरकारी आवाहनाचे पालन करा!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (दि. 23) जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनचे भारतीय क्रीडापटूंकडूनही कौतुक झाले. भारतात आलेला इंग्लंडचा क्रिकेटपटू पीटरसन यानेही सर्वांना आपापल्या सरकारने केलेल्या आवाहनाचे पालन करायला हवे, असे म्हटले आहे.
यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, आर अश्विन, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, गौतम गंभीर, रवी शास्त्री, कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, बबिता फोगाट यांच्यासह अनेक क्रीडापटूंनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची विनंती केली. आता विदेशी खेळाडूंनीही सरकारी आवाहनाचे समर्थन केले आहे.
इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज पीटरसन एका कार्यक्रमाच्या चित्रिकरणासाठी काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये आला होता. त्यानेही भारतीयांसाठी एक ट्विट केले. तो म्हणाला, ’नमस्ते इंडिया. कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी आपण एकत्र यायला हवे. सर्वांना आपापल्या सरकारने केलेल्या आवाहनाचे पालन करायला हवे. काही दिवसांसाठी घरीच राहा, आपली हुशारी दाखवण्याची हीच ती वेळ. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम.’ पीटरसनने हे ट्विट हिंदीतून केले.
‘केपी’च्या या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही रिप्लाय दिला आणि म्हटले की, विस्फोटक फलंदाज आपल्याला काही सांगत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी आपणही एकत्र येऊया. पंतप्रधानांच्या या ट्विटवर केपीने त्वरित रिप्लाय दिला. त्याने मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले. तो म्हणाला, धन्यवाद मोदीजी, तुमचे नेतृत्वही विस्फोटक आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply