उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील दिघोडे गावचे शरीरसौष्ठव रमेश पाटील यांची मिस्टर इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून एकमेव अशी निवड झाली आहे. याबद्दल आमदार महेश बालदी यांनी पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी भाजप उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, प्रशिक्षक सिद्धेश शिंदे, दिघोडे गाव अध्यक्ष राजेश पाटील, मयूर घरत, निलेश पाटील, मयूर पाटील, प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते.
रमेश पाटील यांनी महाराष्ट्र श्री, द्रोणागिरी श्री, टायटल चॅम्पियन ऑफ चॅम्पियन, वेलर क्लासिक आदी स्पर्धांमध्ये यश प्राप्त केले आहे. ते स्टॉम फिटनेस कोप्रोली येथे व्यायाम व फिटनेसचे ट्रेनिंग घेतात. त्यांना आर्यन पाटील, कोच सिद्धेश शिंदे, निशिकांत घरत, आशिष पाटील, अनिकेत पाटील यांचे नेहमी मार्गदर्शन लाभत असते.
Check Also
महापालिका कर्मचार्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर
म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …