कर्जत : विजय मांडे
बहुचर्चित ‘वेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून होऊन अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने सर्व उच्चांक मोडले आहेत. या चित्रपटात रितेश-जेनेलिया यांच्या जोडीसोबत चिमुरडीदेखील गाजत असून ती कर्जतची खुशी हजारे ही बालकलाकार आहे.
चित्रपटातील रितेश व जेनेलिया यांच्या अभिनयाचे मोठे कौतुक होत आहे. या सर्वांमध्ये चित्रपटाच्या नायक- नायिकेचे आयुष्य बदलून टाकणार्या खुशी या बालकलाकारानेही जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. या मुलीच्या येण्यानेच चित्रपटाला खरा ट्वीस्ट येतो. या मुलीमुळेच सत्या आणि श्रावणी एकत्र आलेले पाहायला मिळतात.
कर्जत शहरातील भिसेगाव येथे राहणार्या खुशीने चित्रपटात खूप छान काम केले आहे. त्यामुळे तिच्या जबरदस्त अभिनयाचेदेखील कौतुक होत आहे. खुशीने यापूर्वी हिंदी, मराठी चित्रपटातून बालकलाकार म्हणून काम केलेले आहे. वजनदार, प्रवास, सरबजीत, भूत, आपडी थापडी अशा चित्रपटांतून तिला विकी कौशल, ऐश्वर्या राय, श्रेयस तळपदे, अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापूरे, सई ताम्हणकर या सेलिब्रिटींसोबत काम करण्याची संधी मिळाली. वेड चित्रपटामुळे चिमुरडी खुशी पुन्हा अशोकमामांसोबत काम करताना दिसली. प्रवास चित्रपटामुळे झालेली मैत्री या चित्रपटातून अधिकच घट्ट बनली, तर सेटवर जेनेलिया सोबतदेखील तिचे सूर चांगलेच जुळून आले होते.
रितेश आणि जेनेलियाच्या अभिनयाला तोडीस तोड खुशीनेदेखील चित्रपटातील तिचा अभिनय अगदी चोख बजावला आहे. त्यामुळे खुशीचेही सर्वत्र कौतुक केले जात आहे. ज्यांनी वेड हा चित्रपट पहिला असेल त्यांना या मुलीचा अभिनय नक्कीच आवडला असेल.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …
RamPrahar – The Panvel Daily Paper