Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयात बक्षीस वितरण

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव

पनवेल ः रामप्रह वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात झाला. या महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 7) झाला. विविध क्रीडा स्पर्धांमधील विजयी विद्यार्थ्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दोन दिवसांपासून सुरू असणार्‍या या महोत्सवात विद्यार्थ्यांनी रिबीन डान्स, लेझीम, लाठी-काठी, दांडपट्टा यांचे सादरीकरण केले. त्याचबरोबर  शिवकालीन राज्याची, छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण करून दिली. या समारंभात रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांना गौरविण्यात आले. या वेळी मुंबईचे शिक्षण विभाग अधिकारी श्रीकांत गायकवाड, रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचे इन्स्पेक्टर रोहिदास ठाकूर, शहाजी फडतरे, इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, सीबीएससीच्या  मुख्याध्यापिका रजीशा नाईर, राहुल काशीद, कविता दीपक, बाळासाहेब कारंडे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply