Breaking News

पनवेलमध्ये काँग्रेसला झटका; माजी नगरसेवक सिद्धार्थ बांठिया भाजपमध्ये

पनवेल : वार्ताहर
पनवेल शहरात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. युवक काँग्रेसचे माजी प्रदेश जनरल सेक्रेटरी आणि माजी नगरसेवक सिद्धार्थ बांठिया यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पक्षाची शाल स्वीकारत बांठिया यांनी सोमवारी (दि. 9) पक्षप्रवेश केला.
मुंबईतील दादर येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, ठाणे जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिद्धार्थ बंठिया यांनी भाजपचे नेतृत्व स्वीकारले.
या कार्यक्रमास भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, बबन मुकादम, हरेश केणी, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका चारुशीला घरत, शहर खजिनदार संजय जैन यांच्यासह कपिल बोरा, निखिल मुनोथ, देवेंद्र अचलिया, भाविन जैन व सिद्धार्थ बांठिया यांचे समर्थक उपस्थित होते.
तत्कालीन पनवेल नगर परिषदेत सिद्धार्थ बांठिया यांची बांधकाम सभापती म्हणून कारकीर्द गाजली होती. त्यांनी केलेल्या विकासकामांचा फायदा निश्चितच भाजपला होणार असल्याचे बोलले जात आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply