Breaking News

‘पीबीएल’मधून सायनाची माघार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीसाठी आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) पाचव्या हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने गेल्या पीबीएलमध्ये नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते, मात्र 20 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2020 या कालावधीत होणार्‍या आगामी हंगामात ती खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

29 वर्षीय सायनाला चालू वर्षात विजयासाठी झगडावेच लागले. सहा स्पर्धांमध्ये ती पहिल्याच फेरीत गारद झाली. त्यामुळेच हा निर्णय तिने घेतल्याचे बॅडमिंटन क्षेत्रात म्हटले जात आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply