Breaking News

एमपीएससी अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्याचा माजी विद्यार्थ्यांचा मानस

तब्बल चाळीस वर्षांनी अनेक देशांतून पेणमध्ये एकत्र येत आखली योजना

पेण : प्रतिनिधी

पेणमधील कोकण एज्युकेशन सोसायटीची इंजीनियरिंग कॉलेजची इमारत अनेक वर्षापासून बंद आहे. यामध्ये 1983 ते 2008 पर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन जगभरात जाऊन उच्चपदावर नोकरी केली आहे. याच आठवणींना उजाळा देत कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यानी तब्बल चाळीस वर्षानंतर एकत्र येत पुन्हा एकदा नवीन कॉलेज सुरू करण्यासाठी आणि पुढील पिढीला आपण घेतलेल्या शिक्षणाचा फायदा समजाविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी या पुन:र्मिलनासाठी जगातल्या अनेक देशांतून या कॉलेजचे विद्यार्थी एकत्र आले होते. अमेरिका, इंग्लंड, दुबई, कॅनडा, सिंगापूर,ऑस्ट्रेलिया यासह अनेक देशांचा समावेश होता. या वेळी जवळपास 700 च्यावर  माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यामध्ये कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचाही समावेश होता. यावेळी त्यांनी नवीन कॉलेज उभारल्यास पुढील कॉलेजमध्ये एमपीएससी- युपीएससीचे अभियांत्रिकी वर्ग सुरू करण्याचा मानसही बोलून दाखविला,तर ज्या कॉलेजने आम्हाला ज्ञान आणि श्वास दिले त्या शहरात हजारो झाडांची लागवड आणि पुढील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आधारित मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित करणार असल्याचेही सांगितले.  या संविध कार्यक्रमात संविध विशेष अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या संकल्पित सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी आई डे केअर मतिमंद मुलांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.  या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या डॉ.स्नेहलता देशमुख, भुतपूर्व कुलगुरू मुंबई विद्यापीठ, प्राचार्य शरद गणपुळेसर, प्रा.श्री.आर.बी.महाजन, कॉलेजच्या पहिल्या (1983) बॅचचे विद्यार्थी आणि म्हाडा मधील वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले राजीव शेठ, पेणचे उदय साठे, राजू पिचिका, प्रकाश झावरे, मिलिंद बावधनकर, किरण पुजारी, कीर्ती पाटील, डॉ.श्री.अजित मराठे, माधव प्रभू, निशांत कोळगावकर, जितेंद्र गुप्ता, तुषार देसाई, मनोज भोळे, श्रीपाद फाटक, राहूल फणसाळकर, अजित दामले, आनंद देशपांडे, प्रशांत घाणेकर, रविंद्र सिंग, संदीप म्हात्रे, राजेश गुप्ते, एम्.बी.पाटील आदींच्या आयोजन कमिटीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply