Breaking News

लोकशाहीसाठी पत्रकारितेचे महत्त्वाचे योगदान -तांबोळी

चौक : प्रतिनिधी

खालापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघ व खालापूर तालुका वकील बार असोशिऐशन यांच्या विद्यमाने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पत्रकारांचा सन्मान,या कार्यक्रमात बोलताना पत्रकारितेचे काम केवळ बातम्या देण्याचं नसून गरिबांना न्याय, विकास कामे, इत्यादी शास्वत विकास कामातही मोलाचे असते.पत्रकारिता ही चौथा आधारस्तंभ असते असे प्रतिपादन  खालापूर तालुका तहसीलदार आयुब तांबोळी यांनी या वेळी काढले. अलीकडेच इलेक्ट्रॉनिक्स मीडिया ही खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती घेऊन पत्रकारांनी त्याप्रमाणे आपले कार्य आचरणात आणले पाहिजे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आम्ही या पत्रकारांच्या हितासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याचा विचार करीत आहोत. या कार्यक्रमात गटविकास अधिकारी बालाजी पुरी पंचायत समिती खालापूर  पी. जी. खडके, दुय्यम निबंधक खालापूर अ‍ॅड. सिद्धेश जितेकर.अध्यक्ष, खालापूर तालुका वकीलबार असोसिएशन अ‍ॅड. जयवंत पाटील अध्यक्ष खालापूर  तालुका युवा वकील संघटना, सुधीर माने  अध्यक्ष  खालापूर  तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघ रविंद्र जाधव रायगड भूषण कार्याध्यक्ष, खालापूर  तालुका ग्रामीण पत्रकार संघ अ‍ॅड. राजदत्त धारकर (नोटरी) वालचंद्र ओसवाल माजी सरपंच वावोशी हजर होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी ‘रयत’तर्फे हृद्य सत्कार

संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार गौरव सातारा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या …

Leave a Reply