Breaking News

आंतर महाविद्यालयीन फेस्टिवलमध्ये रामशेठ ठाकूर कॉलेजचे यश

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जे. के. शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात (घणसोली नवी मुंबई) 16 जानेवारी रोजी आंतर महाविद्यालयीन फेस्टिवल आव्हान अंतर्गत वेगवेगळ्या संस्कृती स्पर्धा आयोजित केल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने वैयक्तिक गायन, एकल नृत्य, मेकअप स्पर्धा व ग्रुप डान्स अशा वेगवेगळ्या स्पर्धा होत्या. या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले आहे. ग्रुप डान्समध्ये प्रथम क्रमांक, मेकअप स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक दीक्षा वासकर हिने पटकाविला, सोलो सिंगिंगमध्ये हर्षल शिंदे एस वाय बी कॉम यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तसेच सोलो डान्समध्ये प्राणदीप बोराह याने प्रथम क्रमांक पटकाविला. प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड यांनी सर्व विजेतांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या तसेच महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. राहुल कांबळे व इतर सर्व प्राध्यापक वृंद यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply