पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील पाचगणी आदिवासी वाडीतील तरुणाचा पेण शहरातील म्हाडा कॉलनी येथे एका खासगी बांधकामावर पाणी मारताना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी, पेण तालुक्यातील पाचगणी डोंगराळ भागात असणारी काही आदिवासी कुटुंबे उदरनिर्वाहासाठी शहराच्या आजूबाजूला झोपड्या बांधून राहत आहेत. अंतोरे फाटा येथेही काही कुटुंबे राहत असून यातील मोलमजुरी करणारा जयराम गोविंद पारधी (वय 20) हा मंगळवार 17 जानेवारी रोजी सकाळी 8: 30 वाजण्याच्या सुमारास शहरातील म्हाडा कॉलनी येथील एका घराच्या बांधकामावर पाणी मारत होता. त्या वेळी त्याला विजेचा धक्का लागला. यावेळी त्याला उपचारासाठी पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले तेथे त्याला डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले. याबाबत सख्या गोविंद पारधी यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली असून पेण पोलिस ठाण्यात गुन्हा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी
भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …
RamPrahar – The Panvel Daily Paper