Breaking News

शिक्षकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक

खारघर : प्रतिनिधी,
पनवेल : वार्ताहर
महाराष्ट्र राज्य नगरपरिषदा व महानगरपालिका शिक्षक संघाची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत विविध मागण्यांसंदर्भात बैठक शुक्र्रवारी (दि. 27) बैठक झाली. शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत विविध मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी तसेच शिष्ट मंडळाला दिले. 20 जानेवारीला आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य नपा व मनपा शिक्षक संघाच्या झालेल्या एक दिवसिय लक्षवेधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निवास स्थान वर्षा बंगल्यावर आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोबतच्या शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जून कोळी, उपाध्यक्षा ज्योत्स्ना भरडा, राज्य महिला आघाडी प्रमुख साधनाताई साळुंखे, कोकण विभागीय अध्यक्ष वैभव पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.शिक्षक संघाने शंभर टक्के वेतन अनुदान, बदली पोर्टल, इच्छूक शिक्षकांना जूनी पेन्शन योजना, 10-20-30 आश्वासक वेतन प्रगती योजना, भविष्यनिर्वाह भत्त्यातील व्याजातील फरक शासनाचा हिस्सा, महानगर तसेच नगर पालिकेतील शिक्षकांना बढती आदी मागण्या या शिक्षक संघाने ठेवल्या होत्या. या सर्व मागण्या करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मेळाव्यात या मागण्या मान्य करण्याची घोषणा करणार असल्याचेदेखील मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांच्या शिष्टमंडळाला दिले.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply