Breaking News

करंजाडेत विविध विकासकामांचे लोकार्पण

नवीन पुलाचे काम लवकरच सुरू करणार -आमदार महेश बालदी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेलजवळील करंजाडे सेक्टर 4मधील टाटा पॉवर हाऊस येथे दोन गार्डन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय आणि ज्येष्ठ नागरिक संघासाठी केलेल्या आसनव्यवस्थेचे लोकार्पण उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी आणि विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि. 10) करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामे करून सरपंच मंगेश शेलार यांनी निवडणुकीदरम्यान दिलेल्या शब्द पाळला आहे.
पनवेलच्या उरण नाका येथून करंजाडे येथे ये-जा करताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे करंजाडेवासीयांना लवकरच एक नवीन पूल मिळणार आहे. त्याचे काम पाच महिन्यात सुरू होणार असल्याचे या वेळी आमदार महेश बालदी यांनी सांगितले.
करंजाडेची ओळख ही झपाट्याने वाढणारे शहर म्हणून अशी आहे. येथील वाढते नागरीकरण लक्षात घेत जनतेच्या भल्यासाठी कसे चांगले काम करता येईल हा प्रयत्न नेहमीच आपले आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून होताना दिसतो, असे आमदार विक्रांत पाटील यांनी सांगितले.
करंजाडे येथील रस्ते, सीसीटीव्ही कॅमेरे, गार्डन आणि इतर गोष्टींचे दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. रस्ते चकाचक झाले आहेत आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, तर पाण्याचा प्रश्नदेखील 80 टक्के सुटला असल्याचे मंगेश शेलार यांनी सांगितले.
या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते कर्णा शेलार, सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, संदेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील भोईर, तुषार नागे, कृष्णा पाटील, सत्यजित पाटील, विक्रम मोरे, मनोज घुगे, बंटी प्रबळकर, प्रदीप गावडे, निनाद मुंबईकर, सुषमा मयेकर, रश्मी गुप्ता, ज्योती तातरे, सत्यजित पाटील, कृष्णा कातले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Check Also

भारतमाता चित्रपटगृहाशी माझं नातं अगदी वेगळं…

भारतमाता चित्रपटगृहाने छान कात टाकली. ते आजचं झाले.बदल हा होतच असतो, तो व्हायलाही हवा. काही …

Leave a Reply