मुंबई : प्रतिनिधी
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट यांचं एक अनोख नातं आहे. क्रिकेटचं नावं घेतलं की प्रत्येक भारतीय क्रिकेट प्रेमीच्या तोंडी सचिनचं नाव पहिलं येत. सचिनने काही दिवसांपूर्वी नेट प्रॅक्टिसमधला त्याच्या गोलंदाजीवर विनोद कांबळी फलंदाजी करतानाचा व्हिडीओ ट्वीट केला होता, मात्र सचिनने क्रिजच्या पुढे जाऊन गोलंदाजी केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ही चूक पाहून या व्हिडीओला रिप्लाय म्हणून आयसीसीनं गमतीत सचिन तेंडुलकरसोबत स्टीव्ह बकनर यांचा ‘नो बॉल’ देतानाचा फोटो ट्वीट केला. सचिन आपल्या क्रिकेट करिअरमध्ये अनेकदा चुकीच्या अम्पायरिंगचा बळी ठरला होता. स्टीव्ह बकनर यांनी अनेकदा सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिलं होते. त्यामुळे आयसीसीने मुद्दाम स्टीव्ह बकनर यांचाच फोटो निवडला असावा. आयसीसीच्या ट्वीटला सचिननेही आपल्या खास अंदाजात रिप्लाय केला. बरं झालं या वेळी फलंदाजी नाही तर गोलंदाजी करत आहे, मात्र अम्पायरचा निर्णय नेहमी अंतिम असतो, असा सचिनने आयसीसीच्या ट्वीटला रिप्लाय दिला.