Breaking News

पनवेल परिसरात चोर्‍यांचे प्रमाण वाढले; कंटेनर फोडण्याच्या घटना अधिक

पनवेल : वार्ताहर

कंपनी साईटमध्ये प्रवेश करून साईटवर असलेल्या कंटेनर कॅबीनमधील आणि कॅबीनच्या बाहेरील बाजुस शेजारी उघड्यावरील साईटवर असलेला दोन लाख 94 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टलींग अँड विल्सन प्रा. लि. कंपनीच्या सिमरन मोटर्स शेजारी असलेल्या साईटमध्ये प्रवेश करून साईटवर असलेल्या कंटेनर कॅबीनांपैकी एका कॅबीनची कडी कोयंडा तोडून कॅबीनमधील आणि कॅबीनच्या बाहेरील बाजुस शेजारी उघड्यावरील साईटवर असलेले 81 हजार रुपये किमतीची कॉपर पट्टी, 20 हजार रुपये किमतीचे हॉर्न गॅप फ्यूस सेट, 50 हजार रुपये किमतीचे लाइटेनिंग रेस्टर सेट, 60 हजार रुपये किमतीचे बस पोस्ट इंसुलेटर सेट, सहा हजार रुपये किमतीचे फाऊंडेशन बोल्ट, 40 हजार रुपये किमतीचे ट्रान्सफॉर्मर, 27 हजार सहाशे रुपये किमतीचे एम. एस. चॅनल, नऊ हजार रुपये किमतीचे ट्रान्सफॉर्मर व्हॉल्व असा एकूण दोन लाख 94 हजार 100 रूपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पनवेल : तालुक्यातील उसर्ली गावात कंपनीचे गोडावूनचे व गोडावूनमधील कंटेनरचे लॉक अज्ञात चोरटयाने तोडून गोडावूनमध्ये प्रवेश करून 86 हजारांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस अज्ञात चोराचा शोध घेत आहेत. उसर्ली ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मैदानातील कंपनीचे गोडावूनचे व गोडावूनमधील कंटेनरचे कोणीतरी अज्ञात चोरटयाने लॉक तोडून गोडावूनचे आत प्रवेश करून 10 हजार रुपये किमतीच्या बॅटर्‍या, 15 हजार रूपये किमतीचे केव्ही जनरेटर, 24 हजार रुपये किमतीचे कन्वेयींग मोटार, 12 हजार रुपये किमतीचे हॅण्डब्रेकर, पाच हजार 350 रुपये किमतीचे एमएस रॉड, पाच हजार रूपये किमतीचे वेईंग मशिन, पाच हजार रुपये किमतीचा वॉटर पंप, आठ हजार रुपये किमतीचा एअर कंप्रेशर, दोन हजार 100 रुपये किमतीचा स्टील सीव असा एकूण 86 हजार 450 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply