उरण : प्रतिनिधी
गेली अनेक वर्षे 22 नगर परिषदेच्या भाडे तत्वावर असणार्या 22 व्यावसायिक गाळेधारकांनी आपापल्या गाळ्यांचे भाडे हे उरण नगर परिषदेडे जमाच केले नाहीत. त्यामुळे भाडे तत्वावरील गाळे धारकांकडे एकूण 11 लाखांची रक्कम थकीत असल्याने उरण नगर पालिकेने सदर व्यवसायिक गाळेधारकांना नोटीसा बजावली आहेत. बजावण्यात आलेल्या नोटीसीच्या मुदतीत गाळे धारकांनी थकीत भाड्याची रक्कम न भरल्यास हे गाळ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उरण नगर परिषदेकडून देण्यात आला आहे. उरण नगर पालिकेने बाजार पेठेतील आपल्या ताब्यातील 22 गाळे हे गरजूंना भाडे तत्वावर दिले आहेत, परंतु बाजार पेठेतील सदर गाळ्यांचे भाडे हे गाळे धारक व्यवसायिकांनी उरण नगर पालिकेकडे गेली अनेक वर्षे जमाच केले नाही. त्यामुळे हे गाळे धारक व्यवसायिकांकडे भाडे तत्वावरील एकूण 11 लाखांची रक्कम थकीत झाली आहे. गाळेधारकांनी भाडे तत्वावरील थकीत रक्कम लवकरात लवकरच भरावी अशी सूचना उरण नगर परिषदेकडून करण्यात आली आहे. गाळे धारकांनी थकीत भाड्याची रक्कम उरण नगर पालिकेकडे जमाच केली नाही. उलट त्या गाळ्यांमध्ये त्यांनी पोटभाडेकरू ठेवले असून त्यातून ते महिन्याला प्रत्येकी दहा हजारांचे भाडे वसूल करीत आहेत, मात्र नगर परिषदेचे नाममात्र भाडे देण्यास ते टाळतात. त्यामुळे उरण नगर पालिकेकडे 22 गाळे धारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरावी न पेक्षा उरण नगरपालिका संबंधित गाळे धारकांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याच्या सूचना या गाळे धारकांना देण्यात आलेल्या नोटीसाद्वारे बजावण्यात आल्या आहेत.
बाजार पेठेतील नगर पालिकेच्या ताब्यातील 22 गाळे हे गाळेधारक व्यवसायिकांना भाडे तत्वावर देण्यात आले आहेत, परंतु भाडे तत्वावरील रक्कम संबंधित गाळे धारक व्यवसायिक उरण नगर परिषदेकडे जमाच करीत नाहीत. त्यामुळे गाळेधारकांकडे थकीत भाड्याची रक्कम ही 11 लाख रुपयांची आहे.ती रक्कम उरण नगर परिषदेकडे जमा करावी यासाठी संबंधित गाळे धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. भाड्याची रक्कम न भरल्यास उरण नगर परिषद गाळ्यावर कारवाई करणार आहे.
-राहुल इंगोले, मुख्याधिकारी, उनप