Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात सुमनोत्सव

खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य शास्त्र महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 6) सुमनोत्सव साजरा
करण्यात आला.हा महोत्सव साजरा करण्यापाठीमागचा प्रमुख उद्देश महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना वेगवेगळ्या फुलांविषयी माहिती व्हावी तसेच त्या फुलांचा योग्य पद्धतीने वापर करने हा होता. या वेळी महाविद्यालयातील सुमारे 40 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वेगवेगळी फुले घालून तसेच वेगवेगळ्या वेषभूषा परिधान करून आले होते.प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड महोत्सवासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या. या महोत्सवाचे आयोजन वनस्पती शास्त्र विभागामधील प्रा. डॉ. शुभांगी वास्के व तसेच प्रा. राहुल कांबळे सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनी केले. तसेच प्रा. सफीना मुकादम व इतर सर्व प्राध्यापक वृंद यांनी सहकार्य केले.
संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक करून पुढील उपक्रमांसाठीशुभेच्छा दिल्या.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply