Breaking News

टाळेबंदीमध्येही जेएनपीटीचे कार्य उल्लेखनीय

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणि देशांतर्गत आर्थिक व्यवहारात सुरू झाल्याने जेएनपीटीमध्ये  मालवाहतूकीमध्ये निरंतर वाढ झाली आहे. कोविड 19 साथीच्या काळात भारतातील सर्व व्यवसाय ठप्प झाले असताना मालवाहतुकीमधील ही प्रगती म्हणजे सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये लवकरच सुधारणा होण्याचे निदर्शक आहे, जे सध्या अतिशय महत्त्वपूर्ण आहे. लॉकडाऊन दरम्यान जेएनपीटीला विविध आव्हानांचा सामना करावा लागला, तरी सुद्धा जेएनपीटीने 31 ऑगस्टपर्यंत 1,643,784 टीईयू आणि 694 जहाजांची हाताळणी करीत उल्लेखनीय कार्य केले आहे.

लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या कालावधीत माल हाताळणीमध्ये 35 टक्क्यांहून अधिक घट झाली होती, परंतु ऑगस्ट महिन्यापर्यंत हळूहळू ही घट 16.61%पर्यंत खाली आली आणि आता पोर्ट आपल्या कोविडच्या पूर्व कामगिरीच्या पातळीवर पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे आणि आतापर्यंतच्या कामगिरीच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की यापुढेही जेएनपीटी अशीच प्रगती सुरू ठेवेल. लॉकडाउन सुरू झाल्यापासूनच, जेएनपीटीने आपले भागधारक, कर्मचारी, शिपिंग कंपन्या आणि स्थानिक समुदायासाठी अनेक उपाययोजना केल्या.

योग्य वेळेवर केलेल्या उपाययोजनांमुळे जेएनपीटी प्रत्येक महिन्यात कामगिरीत सुधारणा करीत आहे. जेएनपीटीने जुलै 2020 महिन्यात हाताळणी केलेल्या 3,44,316 टीईयूच्या तुलनेत ऑगस्ट 2020 महिन्यात 3,52,735 टीईयूची मालाची हाताळणी केली आहे. ऑगस्ट, 2019 मध्ये जेएनपीटीने 5.68 दशलक्ष टन मालाची हाताळणी केली होती, त्या तुलनेत ऑगस्ट, 2020 महिन्यात जेएनपीटीनेएकूण 4.74 दशलक्ष टनमालाची हाताळणी केली आहे.

कोरोना काळात पोर्टचे कामकाज आणि लॉजिस्टिक सप्लाय चेन सुरळीत सुरू ठेवण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. त्याचबरोबर जेएनपीटी हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये रूपांतरित करून आम्ही स्थानिकांना या संकटातून मुक्त होण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

-संजय सेठी, अध्यक्ष, जेएनपीटी

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply