Breaking News

टीसीएस, इन्फोसिसमधील मेगाभरतीत वाढ; नोकर्‍यांचा सुकाळ

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

वेगवेगळ्या क्षेत्रात नोकर्‍यांमध्ये आलेल्या कपातीनंतर आता आयटी सेक्टरमधून चांगली बातमी आली आहे. आर्थिक वर्ष 2018-19मध्ये प्रमुख आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेज (टीसीएस) आणि इन्फोसिसने गेल्या वित्त वर्षाच्या तुलनेत 42000हून अधिक नोकरदारांना कामावर रुजू करून घेतले आहे. अशा प्रकारे या दोन मोठ्या कंपन्यांमधील भरतीमध्ये 350 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे. फॉर्च्युनच्या रिपोर्टनुसार मुंबईस्थित मुख्यालयात टीसीएसने 31 मार्चला आर्थिक वर्ष समाप्त होण्यापूर्वी 29,287 कर्मचार्‍यांची भरती

केली आहे.  बंगळुरूतल्या इन्फोसिसमध्ये 24016 सॉफ्टवेअर इंजिनीअरची भरती केली आहे. आर्थिक वर्ष 2018-19मध्ये या दोन्ही कंपन्यांनी 53,303 नव्या कर्मचार्‍यांची भरती केली आहे, तर आर्थिक वर्ष 2017-18मध्ये दोन्ही कंपन्यांनी एकूण 11,500 नव्या कर्मचार्‍यांना कामावर रुजू करून घेतले आहे. आर्थिक वर्ष 2017-18मध्ये टीसीएसने 7,775 कर्मचार्‍यांना कामावर ठेवून घेतले होते, तर इन्फोसिसने एकूण 3,743 कर्मचार्‍यांची भरती केली आहे. फॉर्च्युनच्या रिपोर्टनुसार 167 अब्ज डॉलरचा भारतीय सॉफ्टवेअर सेवा उद्योग वेगाने प्रगतिपथावर जातोय. 2019मध्ये आयटी कंपन्या डेटा सायन्स, डेटा एनालिसिस, सोल्युशन आर्किटेक्ट्स, प्रोडक्ट मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), ब्लॉकचेन आणि सायबर सिक्युरिटीमध्ये तज्ज्ञ असलेल्यांची आता या कंपन्या भरती करणार आहेत. आयटी क्षेत्रात जवळपास 2.5 लाख नव्या नोकर्‍या उत्पन्न होणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

– मोदी सरकारच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब मोदी सरकारला रोजगाराच्या मुद्द्यावर लागोपाठ विरोधकांकडून प्रहार सहन करावा लागत आहे. गेल्या पाच वर्षांचा मोदी सरकारचा कार्यकाळ हा जॉबलेस राहिला आहे. मोदी सरकारने दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु मोदी सरकारला वर्षाला एक कोटीचे लक्ष्यही गाठता आले नाही, असा सुमार आणि खोटा प्रचार विरोधकांकडून केला जात होता, परंतु रोजगारासंबंधीच्या या आकडेवारीमुळे विरोधकांचे आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे.  नोकर्‍यांच्या बाबतीत सर्वांत मोठी समस्या स्कील (कौैशल्य)ची आहे. मोदी सरकारने तरुणांच्या कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे मोदी सरकारच्या मुद्रा लोनसारख्या योजनांचा तरुणांना फायदा होत असल्याचा मोदी सरकारचा दावा आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply