Breaking News

कळंब-पाषाणे रस्ता कामाचा शुभारंभ

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील कळंब-पाषाणे या रस्त्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आला. 10 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्यातील पहिल्या टप्प्यातील तीन कोटी 80 लाख रुपये निधीमधील कामासाठी आले आहेत. पाषाणे येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आणि पाषाणे नळपाणी योजनेचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार थोरवे यांच्यासह कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती राहुल विशे, शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा संघटक शिवराम बदे, कळंब विभागप्रमुख भरत हाबळे, रामचंद्र बदे, दिपक कुडके, उत्तम शेळके, पाषाणे ग्रामपंचायतीचे सरपंच गोटिराम वाघ, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जतचे कनिष्ठ अभियंता दिनेश चौधरी आदी उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेले पाषाणे ते कळंब या 12 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 10 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातील पहिल्या टप्य्यात 3. 80 कोटी रुपयांच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते झाला. तसेच या कार्यक्रमात पाषाणे गावासाठी मंजूर झालेल्या जलजीवन मिशनमधील 14 कोटी रुपये खर्चाच्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन देखील यावेळी करण्यात आले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply