Breaking News

आग्राव येथे जुगार अड्डा उद्ध्वस्त

सात जणांवर गुन्हा दाखल

रेवदंडा : प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील आग्राव येथे भरदिवसा मंदिराच्या सार्वजनिक जागेत सुरू असलेला जुगाराचा अड्डा रेवदंडा पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केला. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऐन नवरात्रोत्सवात आग्रावमधील बापदेव मंदिराच्या सार्वजनिक जागेत तीन पत्ती जुगार खेळला जात असल्याची खबर रेवदंडा पोलिसांना लागली होती. त्यानुसार उपनिरीक्षक हर्षद हिंगे, हवालदार गायकवाड, सुनील शिंदे, पाटील, सुभाष जाधव, नाईक भोईर यांच्या पथकाने छापा टाकला. त्या वेळी तेथे काही इसम पैसे लावून जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. पोलीस पथकाने लागलीच त्यांना घेराव घालून रूपेश शेट्टी, सुधीर भगत, विवेकानंद भगत, संतोष वेताळ, प्रभाकर लोदीखान, दैवत लोदीखान व रमेश चोगले अशा एकूण सात जणांना ताब्यात घेतले तसेच पाच हजार 300 रुपये व साहित्य जप्त केले.

याबाबत पोलीस नाईक सुशांत भोईर यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली असून, सात जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील शिंदे अधिक तपास करीत आहेत.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply