Breaking News

खारघरच्या आरोग्य केंद्रात डेंग्यु निदानाचे किट उपलब्ध

भाजप खारघर नगरसेवक व पदाधिकार्‍यांच्या मागणीला यश

खारघर : रामप्रहर वृत्त

भाजप खारघर नगरसेवक व पदाधिकार्‍यांच्या वतीने पनवेल महापालिकेकडे केलेल्या मागणीनूसार खारघर सेक्टर 12 येथील नागरी आरोग्य केंद्रात डेंग्युचे निदान त्वरित होण्यासाठी अँटिजेन (एनएस 1) कार्ड टेस्ट किट उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे   नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी सभागृह नेते परेश ठाकूर व पनवेल महापालिकेचे आरोग्य केंद्राला भेट देवून आभार मानले.

सरत्या पावसाळ्या नंतर डेंग्युचा प्रादुर्भाव वाढतो व साथ पसरण्याचा धोका असतो. अश्यावेळी त्वरित निदान झाल्यास रुग्णावर वेळीच उपचार होवून डेंग्युच्या रुग्णांत होणारी जिवघेणी गुंतागुंत टाळता येते. म्हणून भाजप खारघर नगरसेवक व पदाधिकार्‍यांच्या वतीने पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे खारघरच्या नागरी आरोग्य केंद्रात डेंग्युचे निदान त्वरित होण्यासाठी अँटिजेन (एनएस 1) कार्ड टेस्ट किट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत परेश ठाकूर यांनी पनवेल महापालिकेस सूचना दिल्या. त्यानंतर थोड्याच दिवसात किट उपलब्ध करण्यात आले. यामुळे आता डेंग्यूचे त्वरित निदान होऊन साथीला अटकाव करणे शक्य होणार आहे.

भाजप खारघरच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन सभागृह नेते परेश ठाकूर व पनवेल महापालिकेचे आभार मानले. या वेळी भाजप खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव, सरचिटणीस दीपक शिंदे, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, रामजी बेहरा आदी उपस्थित होते.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply