खारघर : रामप्रहर वृत्त
सतीश हावरे दिव्यांग शाळेचा आठवा वार्षिक क्रीडा महोत्सव खारघरमध्ये झाला. या महोत्सवात सुमारे 40 दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध खेळांत सहभाग घेत प्रतिसाद दिला.
या वार्षिक क्रीडा महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते दीपक शिंदे, प्रवीण बेरा व विशाल उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना मेडल, सर्टिफिकेट व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक डॉ. स्वाती खाडे, मुख्याध्यापिका मनीषा ठाकरे, विश्वस्त स्मिता स्वामी, डॉ. जयप्रभा असोरे, शिक्षिका चेतना धुरी व रूपल धनेशा, शांती चाडय्याची, कविता दहीफळे, फिजिओथेरिपिस्ट डॉ. श्रद्धा पेडणेकर, सहाय्यक शिक्षिका सीमा व श्रद्धा, मदतनीस कर्मचारी देवी, सुनीता देवी व मोहम्मद, टिळक विद्यापीठाचे फिजिओथेरेपी डिपार्टमेंटचे शिकाऊ डॉक्टर्स यांनी विशेष मेहनत घेतली.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …