Breaking News

जमीर लेंगरेकरांवर कारवाई करा!

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेची मागणी; विशाखा समितीमार्फत चौकशीसाठी निवेदन सादर

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची विशाखा समितीमार्फत चौकशी करून त्यांच्यावर आठ दिवसांत कारवाई करावी; अन्यथा एक लाख शिक्षकांचा मोर्चा मुंबईत काढण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेमार्फत राज्य अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे. ते सोमवारी (दि. 2) काढण्यात आलेल्या मोर्चात बोलत होते.

रायगड जिल्हा परिषदेकडून समायोजन करण्यात आलेल्या उपशिक्षिका ज्योत्स्ना घरडा यांची दोन वर्षांत चार वेळा बदली करण्यात आली आहे. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देण्यासाठी या बदल्या केल्या असल्याची घरडा यांची तक्रार आहे. लेंगरेकर यांनी आपला मानसिक छळ केल्याबद्दल व वरिष्ठ लिपिक नामदेव पिचड यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करावे आणि त्यांची विशाखा समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी घरडा  यांनी केली होती. त्याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटने राज्य अध्यक्ष अर्जुन कोळी, जिल्हा अध्यक्ष बाबुराव पालकर, तालुका अध्यक्ष वसंत मोकल, प्रमोद लांगी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता.

या वेळी मोर्चासमोर उपायुक्तांनी आपल्याला कशी वागणूक दिली याबद्दल सांगताना ज्योत्स्ना घरडा यांना आपल्या भावना आवरणे कठीण झाले. त्यानंतर राज्य अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी आठ दिवसात कारवाई न झाल्यास एक लाख शिक्षकांचा मोर्चा मुंबईत काढण्याचा इशारा आयुक्तांना दिला. आयुक्त गणेश देशमुख यांच्या अनुपस्थितीत शिष्टमंडळाने उपायुक्त संजय शिंदे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. शिंदे यांनी नियमाप्रमाणे चौकशी सुरू असून, त्याचा अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मोर्चेकर्‍यांना सांगितले.

दरम्यान, मोर्चामध्ये अनेकजण शिक्षक नसलेले टोप्या घालून आले होते. एका दारुड्याच्या हातात फलक होता  व त्याला तोल सांभाळता येत नव्हता. त्याचा फोटो काढताच त्याच्या हातातून फलक काढून घेण्यात आला. तो आपण ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा असल्याचे सांगत होता, तर काही तरूण आम्ही पालिकेच्या शाळेत आहोत सांगत होते, पण कोणत्या विचारल्यावर त्याला विचारा सांगून बाजूला जात होते.

उपायुक्त जमीर लेंगरेकर यांचे आतापर्यंतचे काम चांगले आहे. त्यांच्याबद्दल आलेल्या तक्रारीची दखल घेऊन आयुक्त चौकशी करतील आणि तक्रार खरी असल्यास त्यावर योग्य ती कारवाई करतील.

-परेश ठाकूर, सभागृह नेते

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply