Breaking News

प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; खारघरमधील घटना

पनवेल : वार्ताहर

प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने मानसिक तणावाखाली आलेल्या एका 18 वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खारघरमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

या घटनेतील मृत तरुणी खारघरमध्ये आईसह राहत होती. तसेच ती आईसोबत घरकाम करण्यासाठी जात होती. त्याच भागात राहणार्‍या तरुणाने काही महिन्यांपूर्वी तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले होते. यादरम्यान त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते, मात्र त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळे तरुणी मानसिक तणावाखाली होती. याच तणावातून तिने दुसर्‍या दिवशी घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर तरुणीच्या बहिणीने खारघर पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply