पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 3) नव्या 137 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 177 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 54 व ग्रामीण 11) तालुक्यातील 65, खालापूर 45, उरण नऊ, रोहा पाच, पेण चार आणि कर्जत, अलिबाग व तळा तालुक्यातील प्रत्येकी तीन जणांचा समावेश आहे. सुदैवाने जिल्ह्यात गुरुवारी एकही मयत रुग्ण आढळलेला नाही.
दरम्यान, नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 57,522 झाला असून, मृतांची संख्या 1609 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 54,888 जण कोरोनामुक्त झाले असून, 1025 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
Check Also
चित्रपट स्टूडिओतील मिनी थिएटर्स… एक वेगळं विश्व
आज मी जेव्हा परेल येथील राजकमल कला मंदिर स्टुडिओत जातो, तेव्हा अनेक गोष्टीसह तेथील मिनी …
RamPrahar – The Panvel Daily Paper