Breaking News

माय बोली साजिरी आविष्काराने पनवेलकर मंत्रमुग्ध

पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आणि मराठी राजभाषा दिन यांच्या औचित्य साधून भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हातर्फे आयोजित माय बोली साजिरी-मराठी मनाचा कॅनव्हास या संस्कृतीवर्धक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पनवेलच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोखले सभागृहात या वेळी रसिकांनी तुडूंब गर्दी केली होती.
अभंग, ओव्या, कविता, म्हणी, उखाणे, गाणी, संत साहित्य, खाद्य संस्कृती, पेहेराव संस्कृती, शस्त्रास्त्र संस्कृती व असे अनेक विषय या अभिवाचनात्मक कार्यक्रमात मांडण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या हस्ते आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना व कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना वंदन करीत दीपप्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भाजप सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी म्हटले की, पनवेलमध्ये एखादा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला आणि त्याला पनवेलकरांनी उदंड प्रतिसाद दिला नाही असे कधीच घडले नाही. त्यामुळे पनवेलकरांसाठी मराठी संस्कृती आणि नाट्य संस्कृती हा किती जिव्हाळ्याचा विषय आहे हे यामधून समजून येते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली वर्षभर विविध सांस्कृतिक उपक्रम पनवेलमध्ये घेतले जातात आणि रसिक प्रेक्षक हे सातत्याने भरभरून अशी उपस्थिती लावत आम्हाला आशीर्वाद देत असतात, असेही पटवर्धन यांनी सांगितले.
कार्यक्रमास महाराष्ट्र गौरव गीताने सुरुवात झाली व त्यानंतर स्वा. सावरकरांचे अजरामर असे ‘गीत जयोस्तुते’चे सादरीकरण झाले. माय बोली साजिरी कार्यक्रमाच्या लेखक, दिग्दर्शक, निमार्त्या मेघा विश्वास ह्यांनी इशस्तवन केले. त्यांना सहकलाकार समीर सुमन, तपस्या नेवे, अमेय रानडे, मेघा विश्वास, रूपेश गांधी यांनी उत्तम साथ दिली. पनवेलमध्ये प्रथमच असा आगळावेगळा कार्यक्रम सादर झाला.
कार्यक्रमाला भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका रूचिता लोंढे, राजश्री वावेकर, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ, अंजली इनामदार, सुहासिनी केकाणे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सहसंयोजक गणेश जगताप, पनवेल शहर अध्यक्ष निखिल गोरे, संजीव कुलकर्णी, अमोल खेर, रोहित पाटील, श्रेयस वाणी, हर्षल शिंदे, आदित्य उपाध्ये, वैभव बुवा, नुतन पाटील यांनी परिश्रम घेतले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply