श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची बांधिलकी
पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दिव्यांग अनिकेत अनंत चौगुले यास मोफत व्हीलचेअर देण्यात आली आहे. भाजपच्या सेल्फी विथ लाभार्थीचे प्रदेश संयोजक वर्षा भोसले यांच्या हस्ते अनिकेत चौगुले याला या व्हील चेअरचे वाटप बुधवारी (दि. 1) करण्यात आले आहे.
पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील रामशेठ ठाकूर विकास मंडळ सभागृहात झालेल्या या वाटपावेळी महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, माजी उपमहापौर चारुशिला घरत, जिल्हा समन्वयक संध्या शारबिन्द्रे, जिल्हा चिटणीस प्रिया मुकादम, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, अॅड. वृषाली वाघमारे, नीता माळी, सुलोचना कल्याणकर, पुजानी, सुशीला घरत, महिला मोर्चा शहर उपाध्यक्षा सुहासिनी केकाणे, सरचिटणीस सपना पाटील, कोषाध्यक्षा अदिती मराठे, सदस्या नीता मंजुळे, ज्येष्ठ नेत्या विठाबाई सावंत, आशा मुंडे, प्रेमा भोपी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात गेल्या 25पेक्षा जास्त वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणार्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने उच्च शिक्षण घेणार्या आणि आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना तसेच गोरगरीब व गरजूंना नेहमीच मदतीचा हात देऊन स्वतःच्या पायावर उभे केले जाते.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मदतही करण्यात येते. यासोबतच कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगावर मोठे संकट कोसळले. नोकरी धंदा व्यवसायावर संक्रात आली. या महामारीने जीव वाचवताना सर्वसामान्यांना पोटाच्या खळगीचा प्रश्न निर्माण झाला. अशा या भूतो न भविष्यतो संकटकालीन परिस्थितीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सचिव परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लाखो जणांना मदतीचा हात दिला होता.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …