पनवेल : रामप्रहर वृत्त
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वीर वुमन्स फाउंडेशनच्या वतीने आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळे तलाव येथे 10 डस्टबीन देण्यात आले आहेत. फाउंडेशनच्या अध्यक्ष अर्चना ठाकूर यांच्या हस्ते महपिालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्याकडे सोमवारी (दि. 6) हे डस्टबीन सुपूर्द करण्यात आले.
वीर वुमन्स फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत. फाउंडेशनच्या सदस्यांना पनवेल शहरातील सौंदर्याचे केंद्रबिंदू असलेल्या वडाळे तलाव परिसरात कचरा टकण्यासाठी डस्टबीन उपलब्ध नसल्याचे निर्दशनास आले. हे लक्षात घेत फाउंडेशनच्या वतीने आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळे तलाव परिसराकरिता 120 लिटरचे 10 डस्टबीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. फाउंडेशनच्या अध्यक्ष अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते महापालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, फाउंडेशनच्या उपाध्यक्ष सृष्टी निसार, सचिव सीमा जैन, खजिनदार अर्चना सोनी, पूनम जैन, नम्रता. एम. बांठिया, नम्रता एस. बांठिया, सिंपल जैन, कीर्ती मुनोत, अलका मेहता, पनवेल मनपा स्वच्छता निरीक्षक महेंद्र भोईर, जयेश कांबळे आदी उपस्थित होते.
या वेळी वीर वुमन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष अर्चना ठाकूर यांनी, वडाळे तलाव परिसर हा सर्वांत स्वच्छ आणि सुंदर म्हणून ओळखला जातो. याकरिता आणि स्वच्छ भारत अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविला असल्याचे सांगितले.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …