Breaking News

विक्रांत पाटील यांच्या जन्मदिनी रोपलागवडीचा संकल्प

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल महानगर पालिकेचे उपमहापौर तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस विक्रांत पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त के. एल. ई महाविद्यालय आणि बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने तब्बल दहा हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याचा महासंकल्प करून अभियानाला सुरुवात करण्यात आली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी विक्रांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पनवेल महापालिकेचे उपमहापौेर विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केएलई महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग, बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होऊन, वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक राजेंद्र शर्मा, भाजपनेते ताणाजी खंडागळे, बुधाजी ठाकूर, समिर कदम, प्रशांत कदम, केएलई महाविद्यालयाचे प्राचार्य चंदा मेरीया यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply