पनवेल : वार्ताहर
कळंबोली येथील मायाक्का देवी मंदिरामध्ये दैवत फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याठिकाणी 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
दैवत फाउंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अक्षय आंधळे यांच्या संकल्प संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवण्यात आला. या वेळी त्यांना मंडळाचे सल्लागार बबन बारगजे यांचेही सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर घुगे, अमोल बिनवडे, सागर घुले, सुरेश गर्कळ, अतुल कोळकर आदी तरुणांचा मोठा सहभाग होता. दैवत फाऊंडेशनतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी किमान 250 बॉटल रक्त जमा केले जाते. आतापर्यंत 500च्या वरती रक्ताच्या पिशव्या जमा झालेल्या आहेत. पुढील आणखी काही दिवस हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर चालणार आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन अक्षय आंधळे व बबन बारगजे यांनी केले आहे.