Breaking News

रायगड जिल्ह्यात होळी, धुळवड उत्साहात साजरी

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात होळी आणि धुळवड उत्साहात साजरी करण्यात आली. परंपरेप्रमाणे सोमवारी (दि. 6) रात्री होळी पेटविण्यात आली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी (दि. 7) एकमेकांना रंग लावून धुळवडीचा आनंद लूटण्यात आला.
वाळलेली झाडे, पेंढ्यापासून रचलेल्या तसेच फुले, पताका व अन्य साहित्याने होळ्या सजविण्यात आल्या होत्या. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तिचे पूजन करण्यात आले. जिल्ह्यात या वर्षी दोन हजार 880 सार्वजनिक, तर एक हजार 119 खासगी अशा एकूण तीन हजार 394 होळ्यांचे दहन करण्यात आले.
होळीनंतर मंगळवारी सकाळपासूनच धुळवड सुरू झाली. बच्चेकंपनीच्या हातात पिचकारी, तर तरुणाईच्या हातात सुके रंग होते. होळकर्‍यांचे जथ्थेच्या जथ्थे नाक्यानाक्यावर सर्वांना रंगविण्यासाठी सज्ज होते. रंगाच्या या सणात तरुणाईबरोबरच वयोवृद्धही सहभागी झाले होते.
दरम्यान, 24 तास काम करणार्‍या पोलिसांनीही धुळवड साजरी केली. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आपल्या सहकार्‍यांसह धुळवडीचा आनंद लुटला. अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे हेही या वेळी उपस्थित होते.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply