Breaking News

जासई विद्यालयात लोकनेते दि. बा. पाटील यांची पुण्यतिथी

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील जुनियर कॉलेजमध्ये लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी 1984च्या लढ्याचे नेतृत्व केलेल्या रणरागिणी भारतीताई पवार, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्षआणि भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील, दि. बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील तसेच लता सरनाईक, प्रभाकर पाटील, सुभाष पाटील, महेश लाड, जासई गावचे सरपंच संतोष घरत, धर्मा पाटील, ह. भ. प. धावजी महाराज, ह. भ. प. गोपीनाथ ठाकूर, यशवंत घरत, डी. आर. ठाकूर, अमृत ठाकूर, अविनाश पाटील अशा अनेकांची उपस्थिती लाभली होती.

विद्यालयाचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर अरुण घाग व विद्यालयाचे सर्व सेवक वृंद व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या प्रांगणातील पंच महा विभूतींच्या पुतळ्यांचे पूजन तसेच कर्मवीर अण्णांच्या पुतळ्याचे व दि. बा. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी भारतीताई पवार यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून सर्व मान्यवरांनी पालखीचे पूजन भक्तिभावाने केले. पालखीची मिरवणूक गावातून ढोल-ताशांच्या लेझिम पथकाच्या गजरात काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने जनसमुदाय सामील झाला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नुर शेख यांनी केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply