नवी मुंबई : बातमीदार
प्रेयसी भेटत नाही या रागातून प्रियकराने तीच्या डोक्यात थेट रॉडने वार करून तिला जखमी केल्याची घटना वाशी पामबीच, गॅलेरीया येथील एका हॉटलेमध्ये घडली आहे. याविरोधात एपीएमसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरखैरणे येथे राहणार्या एका अल्पवयीन तरुणीचे कर्जत येथे राहणार्या सहील लाड याच्याशी प्रेम संबंध होते. साहिल या मुलीच्या भावाचा मित्र होता त्यामुळे तो सतत घरी येत असायचा. त्यातून त्या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यांच्या या प्रेमसंबंधाची माहिती या अल्पवयीन मुलीची मोठी बहिण सायना शेट्टी हिला मिळाली व तीने सहिलशी भेटण्यास तीला सक्त मनाई केली. त्यामुळे ती साहिला टाळू लागली. याचा राग साहिलच्या मनात होता.
दरम्यान, 15 मार्च रोजी या अल्पवयीन मुलीचा वाढदिवस होता. ती आपला वाढदिवस वाशी, पाम बीच गॅलेरीया येथील एका हॉटेलमध्ये साजरा करण्यास आली होती. त्यावेळी तिथे साहिल लाड येणार असल्याचे तिला समजले. त्यामुळे तिने आपली मोठी बहिण सायना शेट्टी हीला बोलावून घेतले. दरम्यान, साहिल त्या हॉटेल मध्ये आल्यावर सायनाने त्याला आपल्या बहिणीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. यावरून साहिल व सायना या दोघांमध्ये वादावादी झाली. यातून सायनाने साहिलला मारहाण केली. त्याचा राग मनात धरून साहिलने आपल्या पँटच्या खिशात लपवलेला लोखंडी रॉड काढून प्रेयसीच्या डोक्यात मारला. यात ती अल्पवयीन तरुणी जखमी झाली आहे. यावेळी हॉटेल मध्ये जमलेल्या नागरिकांनी तातडीने साहिल याला पकलडे आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. तर जखमी तरुणीला वाशी पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटने विरोधात एपीएमसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …