Breaking News

पनवेल देवद येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
जल जीवन मिशन योजनेतंर्गत पनवेल तालुक्यातील देवद येथे नवीन पिण्याच्या पाण्याची टाकी अणि नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 90 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचे तसेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक ग्रामविकास निधीतून साकारण्यात येणार्‍या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 6) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बोलताना त्यांनी राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांच्या हिताचे काळजी घेणारे सरकार असून याचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशहिताच्या द़ृष्टीने अनेक महत्त्वाची पावले उचलत आहेत. त्यांच्या संकल्पनेतून हर घर नल हर घर जल ही पाण्याची योजना साकारली जात आहे. या योजनेतंर्गत देवद ग्रामपंचायतीसाठी 90 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून पाण्याचे वितरण तसेच पंपिंगचे काम करण्यात येणार असून लवकरच पाण्याच्या टाकीचाही समावेश केला जाणार आहे. या कामाचे तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक ग्रामविकासच्या 10 लाख रुपयांच्या निधीतूून देवद येथील साक्षीनगरकडे जाणार्‍या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या सर्व कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माज पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे, सरपंच शीतल सोनावणे, उपसरपंच प्रभाकर सोनावणे, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विनोद वाघमारे, दिनेश वाघमारे, सदस्य निलेश जुवेकर, करुणा वाघमारे, संतोष वाघमारे, राजेश पाटील, वामन वाघमारे, सुरेश वाघमारे, रामभाऊ वाघमारे, प्रवीण वाघमारे, राजेंद्र ठोकळ, मंगेश वाघमारे, संदीप वाघमारे, विजय वाघमारे, निलेश वाघमारे, पद्माकर वाघमारे, शशिकांत वाघमारे, गणेश वाघमारे, अरुण वाघमारे, योगेश बनकर, गोरख, महावीर पांडे, भूपेंद्र पाटील, दिवेश भगत, राम वाघमारे, अनंता वाघमारे, भगवान भंडारे, किरण धुरेंदर, वृषाली वाघमारे, निनाद गाडगीळ, राहुल पाटील, जितेंद्र वाघमारे, ठेकेदार मयुर कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात 4 ऑगस्टला मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार महाशिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त अखंडपणे समाजोपयोगी उपक्रमे राबविणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, …

Leave a Reply