पनवेल : वार्ताहर
पनवेल येथील जयदीप सुधाकर मोरे (21) या विद्यार्थ्यांने ग्रॅजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग (गेट) परीक्षेत संपूर्ण भारतात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. जयदीपने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
गेट ही एक अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा आहे, जी उमेदवारांच्या अभियांत्रिकी आणि विज्ञानातील ज्ञान आणि कौशल्यांची चाचणी घेते. संपूर्ण भारतातील इतर हजारो उमेदवारांना जयदीप मोरे याने मागे टाकून आपल्या कठोर मेहनतीने व व्हिजन गेटच्या सहकार्याने हे यश संपादन केले आहे.
जयदीप मोरे हा सध्या अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षात शिकत आहे. त्याला पुढे एमटेक करायचे आहे. त्याने सांगितले की, कॉम्प्युटर सायन्सबद्दल सखोल शोध घेण्यासाठी विशेषतः मी या क्षेत्राकडे आकर्षित झालो, कारण मला कॉम्प्युटर प्रोग्रामिंग खूप मनोरंजक आणि आव्हानात्मक वाटले. मी मॉक टेस्टमध्ये सतत चांगले गुण मिळवत होतो आणि त्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला की, मी एक अंकी रँक मिळवू शकतो. प्रा. आरएसव्ही सरांनी मला रँक 1 मिळण्यासाठी जोर लावला आणि एअर 1 हा माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण होता. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. माझ्या यशाचे श्रेय माझे पालक, प्रा. आरएसव्ही आणि माझ्या समवयस्कांना जाते. माझ्या यशात व्हिजन गेटचा मोठा वाटा आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …