पोलादपूर : प्रतिनिधी
पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथील एका तरुणाचा सावित्री नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 20) सकाळी 10.30च्या सुमारास घडली. यश सुरेश थिटे (वय 22) असे मयत तरुणाचे नाव आहे.
यश थिटे हा सोमवारी नेहमीप्रमाणे सावित्री नदीपात्रामध्ये होडीनाका पिंपळाचा डोह येथे रेड्याला पाणी पाजण्यासाठी गेला होता. यशच्या हातात रेड्याची रस्सी होती. या वेळी रेडा पुढे गेल्यानंतर यशही खोल पाण्यात ओढला जाऊन बुडाला. नरवीर मदत टीमचे दीपक उतेकर आणि अन्य स्थानिक तरुणांनी यशला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र तत्पूर्वीच यशचा मृतदेह पाण्यावर तरंगू लागल्याने त्यास ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर पोलिसांनी उत्तरीय तपासणी, पंचनामा आणि शवविच्छेदनानंतर यशचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
Check Also
कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक
पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी …