Breaking News

तरुणीला जबरदस्तीने दारू पाजून ठेवले शारीरिक संबंध

ज्येष्ठ नागरिकाविरोधात गुन्हा दाखल

पनवेल : वार्ताहर
एका 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने एस टी प्रवासादरम्यान 26 वर्षीय तरुणीशी मैत्री करून त्यांनतर तिची ओळख वाढवून तिला पनवेलला फिरायला जाऊ असे सांगून पनवेलमधील एका हॉटेलमध्ये आणून त्यांनतर जबरदस्तीने दारू पाजून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून मोबाईल चित्रीकरण केल्याची तक्रार पनवेल शहर पोलिसांकडे तरुणीने केले आहे.
अलिबाग ते रोहा एसटी प्रवासादरम्यान या 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची 26 वर्षीय तरुणीशी ओळख झाली. बातचीत करत असताना त्याने सदर तरुणीचा मोबाईल नंबर मागून घेतला. गेले काही दिवस त्यांचे मोबाईलवर बोलणी चालू होती. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकाने त्या तरुणीस पनवेल फिरण्यास जाऊ असे तिला सांगून पनवेल पळस्पे फाटा येथील एका लॉजवर आणले. तेथे त्याने त्या तरुणीस जबरदस्तीने मद्य पाजले व त्यांनतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून मोबाईल चित्रीकरण केल्याची तक्रार सदर तरुणीने पनवेल शहर पोलिसांकडे केली आहे. यानुसार पनवेल शहर पोलिसांनी सदर ज्येष्ठ नागरिकविरोधात भा. दं. वि. कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply