Breaking News

भाजयुमोच्या रिल स्पर्धेचे बक्षीस वितरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त
गुढीपाडव्यानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण भाजपच्या शहरातील मध्यवर्ती कार्यालयात झाले.
या स्पर्धेत एकूण 45 स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रथम क्रमांक शुभम कोळी, द्वितीय नयन सापने आणि तृतीय क्रमांक सोहन जगे यांनी पटकाविला.
विजेत्यांना पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभास माजी नगरसेवक अनिल भगत, स्पर्धेचे आयोजक भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष रोहित जगताप यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply