Breaking News

मंत्री उदय सामंत, छत्रपती संभाजीराजे स्पीड बोट अपघातातून बचावले

अलिबाग : प्रतिनिधी
राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजे प्रवास करीत असलेल्या स्पीड बोटीला सोमवारी (दि. 3) सकाळी मांडवा येथे अपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. पालकमंत्री सामंत यांनी स्वतः पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
शिवराज्याभिषेक सोहळा नियोजनासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत व छत्रपती संभाजीराजे गेट वे ऑफ इंडियावरून अलिबागला येण्यासाठी स्पीड बोटीने निघाले होते. मांडवा जेटीजवळ पोहचल्यावर चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट जेटीखालील खांबाना जाऊन धडकली. सुदैवाने बोटीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना घडली नाही. नंतर चालकाने बोटीवर नियंत्रण मिळवून बोट तरंगत्या तराफ्यावर सुखरूप लावली. यानंतर पालकमंत्री सामंत व संभाजीराजे मांडवा येथे सुखरूप उतरून रस्ते मार्गाने अलिबागकडे रवाना झाले. ही घटना घडली तेव्हा जेटीवर आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply