Breaking News

कोपरा खाडीत अवैध रेती उपसा करणार्‍यांवर कारवाई

पनवेल तहसीलदाराकडून 10 सक्शन पंप व एक बोट नष्ट

पनवेल ः वार्ताहर

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध्य रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी कोपरा खाडीत कारवाई करीत 10 सक्शन पंप आणि एक बोट पूर्णपणे नष्ट केली.

या कारवाई दरम्यान स्वतः तहसीलदार विजय तळेकर हे महसूल विभागाच्या टीमसह घटनास्थळी हजर होते. भरतीच्या वेळी रेती उत्खनन करण्यासाठी आलेल्या सक्शन पंप आणि बोट महसूल पथकाला दिसताच क्षणी तहसीलदारांच्या आदेशाने हि कारवाई करण्यात आली. गॅस कटरच्या सहाय्याने ही रबरी सक्शन पंप नष्ट करण्यात आले. या वेळी तहसिलदार यांच्या सोबत नायब तहासिलदार, तीन सर्कल अधिकारी आणि दोन कोतवाल उपस्थित होते. कोपरा, रोडपाली येथील खाडीतील कारवाई प्रमाणे उलवा खाडीत देखील अशाच प्रकारच्या कारवाईची गरज आहे. विमानतळासाठी केलेल्या भरावाच्या रस्त्यातून रात्रीच्या वेळेला उलवा खाडीतून उत्खनन केलेली रेतीची वाहतुक केली जाते .

तक्रार प्राप्त झाल्यावर वेळोवेळी आम्ही कारवाई करीत आलो आहोत. अशाप्रकारे कारवाई सुरूच राहील. – विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply