Breaking News

चौक विभागातील ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांनी केले स्वागत

चौक : प्रतिनिधी
चौक परिसरातील उद्धव ठाकरे गटामधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 2) भाजप जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. या सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे दोन्ही आमदारांनी स्वागत केले.
आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने व भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या चौक विभागातील कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यानंतर चिचमाळ येथे पक्षप्रवेश कार्यक्रम झाला.
या वेळी चौकचे माजी उपसरपंच दत्ता मांडे, युवा सेनाप्रमुख मयूर मांडे यांच्यासह उपशाखाप्रमुख अतुल सोनटक्के, युवा नेते किरण जाधव, स्वप्नील मालुसरे व कार्यकर्ते, ईसांबे शिवसेना विभागप्रमुख समीर देवघरे, ग्रामपंचायत सदस्य हेमलता देवघरे, ताराबाई हिलम, सदस्य हिरामण हिलम, सोमनाथ देवघरे, गणेश देवघरे व कार्यकर्ते तसेच आंबेवाडी सरपंच जयेश सुतार यांच्या नेतृत्वाखाली सदस्य आणि वडार समाजातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, युवा सरचिटणीस प्रवीण मोरे यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास भाजप युवा मोर्चा चौक जिल्हा परिषद अध्यक्ष दर्शन पोळेकर, ज्येष्ठ नेते मारुती तवले, सरपंच प्रितेश मोरे, माजी उपसरपंच गणेश कदम आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, उरण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार महेश बालदी कार्यरत असून आज ज्यांनी स्थानिक नेतृत्व सुधीर ठोंबरे यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची खात्री मी जिल्हाध्यक्ष या नात्याने देत आहे. सर्वांनी एकोप्याने पक्ष संघटना बळकट करावी.

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply