पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि त्यानंतर स्वतः अशी देशहिताची विचारसरणी असलेल्या आणि त्यानुसार कार्यरत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन गुरुवारी (दि. 6) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पनवेल भाजपच्या वतीने शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्या हस्ते पक्षाच्या ध्वजाचे रोहण करण्यात आले.
या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सचिन पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीता पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, समीर ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष वर्षा नाईक, भाजप शहर सरचिटणीस अमरीश मोकल, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर अध्यक्ष रोहित जगताप, पवन सोनी, सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …